शिक्षक दिन
*एक संघर्षमय प्रवास*
*गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः*
आज मी ज्यांच्यासाठी लिहीत आहे ते माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री महेश पालकर साहेब यांचेविषयी.
माझं पहिली ते चौथी शिक्षण हे जिल्हा परिषद मुलांची शाळा तारळे येथे झाले. मला आठवतंय 1995 ते 1998 असं माझं शिक्षण प्राथमिक शाळेत झाले तेव्हा माझे शिक्षक होते पालकर गुरुजी.
पालकर गुरुजींचे आयुष्य खूप संघर्षमय. शिक्षक होण्यासाठी गुरुजी गावच्या आठवडी बाजारात शनिवारी बाजार मध्ये बसलेल्या व्यापारी, शेतकरी यांच्या पावती गोळा करण्याचे काम करत.आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून ते रडत बसले नाही तर संघर्ष करत राहिले.घराची परिस्थिती गरिबीची काम करत शिक्षण पूर्ण केले आणि प्रथम जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. मला आठवतंय मला पालकर गुरुजी 1 ते 4 शिकवायला होते. गुरुजींची शिस्त कडक, मी ज्या मुलांना शिकवतोय तो प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण अन हुशार झालाच पाहिजेल म्हणून गुरुजी मुलांना ज्ञानार्जन करत असत.
मुलांना शिकवत असतानाच ते स्वतःही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत होते. पालकर गुरुजींना व्यायामाची खूप आवड, सकाळी 9.30 वाजता शाळेत आलेवर शालेय परिसराची स्वच्छता ते स्वतः करत हे पाहून विद्यार्थी देखील मग स्वच्छता करत. त्यानंतर व्यायाम मग शालेय प्रार्थना मग वर्गात ज्ञानार्जन
हा गुरुजींचा नित्य क्रम होता.
मुलांना शिकवत असताना मुलांची गुणवत्ता सुधारली पाहिजेल, विद्यार्थी हुशार झाले पाहिजेत यासाठी प्रसंगी साहेब कठोर देखील होत. म्हणूनच म्हटलंय ना छडी लागे छम छम विद्या येई घम घम वेळप्रसंगी गुरुजींना छडीचा देखील वापर करावा लागला पण यामुळे विद्यार्थी घडले हे आवर्जून सांगावं वाटत. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना गुरुजी स्वतः पण अभ्यास करत असत. एक दिवस पालकर गुरुजी जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त झाले. गरिबी आहे म्हणून रडले नाहीत तर परिस्थितीला सामोरे जातं लढले. बाजारात लिलाव गोळा करणारा व्यक्ती शिक्षणाधिकारी झाला हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. साहेबांना प्रथम पोस्टिंग निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून मिळाले आणि नंतर ते शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा येथे रुजू झाले. शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना पाटण तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून सर्वांत जास्त शाळेच्या खोल्या मंजूर केल्या अन त्या बांधून पूर्ण देखील केल्या.
स्वतः शिस्तप्रिय असलेले साहेब पुढे प्रमोशन होऊन शिक्षण उपसंचालक, सहसंचालक अन राज्याचे संचालक झाले.आज साहेब राज्याचे शिक्षण संचालक (योजना )म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत.
मला आयुष्यात गुरुजी म्हणून साहेबांनी दिलेले ज्ञान पदोपदी उपयोगी पडत आहे. अशा या कार्यतत्पर, शिस्तप्रिय माझ्या गुरूंना म्हणजेच पालकर साहेबांना शिक्षक दिनी वंदन.
🖋️
आपला
रविंद्र रामचंद्र लाहोटी
Comments
Post a Comment