Posts

Showing posts from September, 2023

शिक्षक दिन

Image
*एक संघर्षमय प्रवास* *गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः* आज मी ज्यांच्यासाठी लिहीत आहे ते माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री महेश पालकर साहेब यांचेविषयी. माझं पहिली ते चौथी शिक्षण हे जिल्हा परिषद मुलांची शाळा तारळे येथे झाले. मला आठवतंय 1995 ते 1998 असं माझं शिक्षण प्राथमिक शाळेत झाले तेव्हा माझे शिक्षक होते पालकर गुरुजी.       पालकर गुरुजींचे आयुष्य खूप संघर्षमय. शिक्षक होण्यासाठी गुरुजी गावच्या आठवडी बाजारात शनिवारी बाजार मध्ये बसलेल्या व्यापारी, शेतकरी यांच्या पावती गोळा करण्याचे काम करत.आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून ते रडत बसले नाही तर संघर्ष करत राहिले.घराची परिस्थिती गरिबीची काम करत शिक्षण पूर्ण केले आणि प्रथम जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. मला आठवतंय मला पालकर गुरुजी 1 ते 4 शिकवायला होते. गुरुजींची शिस्त कडक, मी ज्या मुलांना शिकवतोय तो प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण अन हुशार झालाच पाहिजेल म्हणून गुरुजी मुलांना ज्ञानार्जन करत असत. मुलांना शिकवत असतानाच ते स्वतःही स्पर्...