Posts

शिक्षक दिन

Image
*एक संघर्षमय प्रवास* *गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः* आज मी ज्यांच्यासाठी लिहीत आहे ते माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री महेश पालकर साहेब यांचेविषयी. माझं पहिली ते चौथी शिक्षण हे जिल्हा परिषद मुलांची शाळा तारळे येथे झाले. मला आठवतंय 1995 ते 1998 असं माझं शिक्षण प्राथमिक शाळेत झाले तेव्हा माझे शिक्षक होते पालकर गुरुजी.       पालकर गुरुजींचे आयुष्य खूप संघर्षमय. शिक्षक होण्यासाठी गुरुजी गावच्या आठवडी बाजारात शनिवारी बाजार मध्ये बसलेल्या व्यापारी, शेतकरी यांच्या पावती गोळा करण्याचे काम करत.आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून ते रडत बसले नाही तर संघर्ष करत राहिले.घराची परिस्थिती गरिबीची काम करत शिक्षण पूर्ण केले आणि प्रथम जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. मला आठवतंय मला पालकर गुरुजी 1 ते 4 शिकवायला होते. गुरुजींची शिस्त कडक, मी ज्या मुलांना शिकवतोय तो प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण अन हुशार झालाच पाहिजेल म्हणून गुरुजी मुलांना ज्ञानार्जन करत असत. मुलांना शिकवत असतानाच ते स्वतःही स्पर्...

वाढदिवस एका कार्यक्षम अधिकाऱ्याचा

Image
अधिकारी असावा तर असा..❣️ आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खासगी सचिव (Ps) श्री विद्याधर महाले यांचा जन्मदिवस याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा..! काही व्यक्ति असे असतात ते "थिंक ग्लोबली अक्ट् लोकली" या तत्त्वानुसार आपलं जीवनाचं मार्गक्रमण करीत असतात. यामुळेच त्यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आपल्या कामातून ओळख झाली आहे. कार्यतत्पर अधिकारी कसा असावा तर तो महाले साहेबांसारखा कारण कामाच्या बाबतीत ते शिस्तबद्ध आहेत.  देवेंद्रजी हे रत्नपारखी आहेत ते एखाद्याची क्षमता ओळखून त्याला योग्य संधी देत असतात हीच संधी त्यांनी विद्याधरजी महाले सारख्या अनुशासित असणार्‍या अधिकाऱ्याला दिली आहे. त्यांना माहिती आहे आपले बॉस प्रचंड क्षमतेने जनतेसाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. तर महाले साहेब यात कसे कमी पडतील तर अजिबात नाही.  अशा कार्यतत्पर, अनुशासित, क्षमतावान अधिकाऱ्याला उदंड आयुष्य लाभो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. रविंद्र रामचंद्र लाहोटी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सोशल मीडिया सातारा प्रभारी सोशल मीडिया

फोडाफोडीच्या राजकारणाचे शिरोमणी शरद पवारच

भाजपा वर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करणाऱ्या शरद पवार साहेबांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत 1)1978 ला वसंतदादांचे सरकार पडायला काँग्रेस कोणी फोडली 2)छगणं भुजबळ शिवसेनेतून फुटून काही आमदार घेऊन तत्कालीन काँग्रेस मध्ये कुणाच्या सांगण्याने आले 3)राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थापणेसाठी काँग्रेस कुणी फोडली 4)त्याचवेळेस शिवसेनेतील गणेश नाईक यांना राष्ट्रवादी मध्ये कुणी घेतले 5)गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतण्या कुणी फोडला 6)शिवसेना भाजपा पासून दूर जावी म्हणून 2014 ला कोणता अदृश्य हात समोर आला भाजपने तो स्वीकारला नाही 7)2019 मुख्यमंत्री पदाची खुर्ची उद्धवजींना देऊन त्यांचा पक्ष खिळखीला करण्यामागे कोण 8)छत्रपती घराणे,मोहिते पाटील, आमदार गोरे,क्षीरसागर अशी अनेक मोठी घरे स्वतःच्या पक्षासाठी कुणी फोडली साहेब या प्रशांनी उत्तरे महाराष्ट्र मागतोय. ज्यांच्या पक्षाचीच स्थापना दुसरा पक्ष फोडून झालीय त्या पवार साहेबांनी तरी भाजपावर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करू नये कारण इतिहासात नोंद आहे ती कोणी बदलू शकत नाही फोडाफोडीच्या राजकारणाचे शिरोमणी शरद पवारच आहेत

*भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्याला ताकद देणार*:- *आंण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील, भाजपा प्रदेश सचिव श्री भरतजी पाटील*आज भारतीय जनता पार्टी पाटण तालुका संघटनात्मक बैठक आज आंण्णासाहेब पाटील महामंडळचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सचिव भरतजी पाटील नाना यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.बैठकीच्या सुरवातीला आज पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांचा 101 वा मन की बात कार्यक्रम पाहण्यात आला. यानंतर संघटनात्मक बैठक सुरु झाली. प्रथम नरेंद्रजी पाटील यांनी बैठकीत पाटण तालुका भाजपचा संघटनात्मक आढावा घेतला.बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना नरेंद्रजी पाटील यांनी प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन तिथे बूथ प्रमुख यांची भेट घेणार आणि भाजपा संघटना पाटण तालुक्यात मजबूत करणार असे प्रतिपादन केले. यानंतर भाजपा प्रदेश सचिव श्री भरत पाटील नाना यांनी पाटण तालुक्यातील भाजपाला पूर्ण ताकद देणार पुन्हा एकदा घरोघरी जाऊन सरकारच्या योजना तसेच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांनी गेल्या 9 वर्षात केलेले काम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आणि एकजुटीने पुन्हा एकदा पाटण तालुका भाजपा संघटना मजबूत करणार असलेचे प्रतिपादन केले. यावेळेस जिल्हा संघटन सरचिटणीस श्री शेखरजी वढणे यांनी मोदी@9 कार्यक्रम पुढील महिनाभर 14 प्रकारचे कार्यक्रम कसे घ्यायचेत ते सांगितले. यावेळेस जिल्हा परिषद माजी सदस्य श्री रामभाऊ लाहोटी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक, प्रज्ञा आघाडी जिल्हा संयोजक फत्तेसिहं पाटणकर, मंडल अध्यक्ष सागर माने तसेच मंडल जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस जिल्हा सोशल मीडिया प्रभारी म्हणून रविंद्र लाहोटी यांना जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आंण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील आणि भाजपा प्रदेश सचिव श्री भरत पाटील नाना यांनी केला.