*भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्याला ताकद देणार*:- *आंण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील, भाजपा प्रदेश सचिव श्री भरतजी पाटील*आज भारतीय जनता पार्टी पाटण तालुका संघटनात्मक बैठक आज आंण्णासाहेब पाटील महामंडळचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सचिव भरतजी पाटील नाना यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.बैठकीच्या सुरवातीला आज पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांचा 101 वा मन की बात कार्यक्रम पाहण्यात आला. यानंतर संघटनात्मक बैठक सुरु झाली. प्रथम नरेंद्रजी पाटील यांनी बैठकीत पाटण तालुका भाजपचा संघटनात्मक आढावा घेतला.बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना नरेंद्रजी पाटील यांनी प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन तिथे बूथ प्रमुख यांची भेट घेणार आणि भाजपा संघटना पाटण तालुक्यात मजबूत करणार असे प्रतिपादन केले. यानंतर भाजपा प्रदेश सचिव श्री भरत पाटील नाना यांनी पाटण तालुक्यातील भाजपाला पूर्ण ताकद देणार पुन्हा एकदा घरोघरी जाऊन सरकारच्या योजना तसेच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांनी गेल्या 9 वर्षात केलेले काम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आणि एकजुटीने पुन्हा एकदा पाटण तालुका भाजपा संघटना मजबूत करणार असलेचे प्रतिपादन केले. यावेळेस जिल्हा संघटन सरचिटणीस श्री शेखरजी वढणे यांनी मोदी@9 कार्यक्रम पुढील महिनाभर 14 प्रकारचे कार्यक्रम कसे घ्यायचेत ते सांगितले. यावेळेस जिल्हा परिषद माजी सदस्य श्री रामभाऊ लाहोटी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक, प्रज्ञा आघाडी जिल्हा संयोजक फत्तेसिहं पाटणकर, मंडल अध्यक्ष सागर माने तसेच मंडल जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस जिल्हा सोशल मीडिया प्रभारी म्हणून रविंद्र लाहोटी यांना जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आंण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील आणि भाजपा प्रदेश सचिव श्री भरत पाटील नाना यांनी केला. Get link Facebook X Pinterest Email Other Apps May 28, 2023 Read more